

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतुमानानुसार आपल्या त्वचेमध्येही बदल होतो. थंडीच्या दिवसात जुनी त्वचा जाऊन त्याठिकाणी नवीन त्वचा येते, तर उन्हळ्यात किरणांच्या माऱ्यामुळे त्वचा कांळवडते. त्यामुळे त्वचा डल पडते. मृत त्वचेची (Dead skin) समस्या जाणवू शकते. यासाठी काही सोपे घरगुती उपायही आपण घरच्या घरी करू शकतो.
मृत त्वचा (Dead skin) काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब्स मिळतात. हे स्क्रब प्रत्येकाच्या त्वचेला सुट होईलच असे नाही. त्वचा अती संवेदनशील असेल दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे सौदर्यंप्रसाधने वापरताना डॉक्टर किंवा ब्युटीशियनचा योग्य सल्ला घेऊनच ती वापरावीत. याव्यतिरिक्त आपलेला सोप्या पद्धतीने घरच्या घरीही मृत त्वचेवर उपायही करता येतात. चला तर जाणून घेवूया विविध घरगुती नैसर्गिक स्क्रबविषयी…
दोन चमचे कोरफड घेऊन त्यात दोन चमचे साखर एकत्र करून घ्या. हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड स्वच्छ पाण्याने धुवा.
दही, पपईचा गर आणि मध चांगल्या पद्धतीने एकत्र करा. एकत्र केलेले हे मिश्रण चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने लावून ठेवा. ७ मिनिटांनी चेहरा थंड स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
मध आणि संत्री या दोन्ही गोष्टी चेहऱ्यासाठी अतिशय पोषक असतात. दोन चमचे संत्री आणि ओट्स पावडर मधामध्ये योग्य पद्धतीने एकत्र करा. याची जाड पेस्ट होईपर्यंत ते नीट एकत्र करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा. ५ ते ७ मिनिटांनी थंड स्वच्छ पाण्याने धुवा.
या स्क्रबरसाठी ओटस, पीठीसाखर आणि टोमॅटो या पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ एकत्र करुन त्यांची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा आणि ३ ते ४ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.