ukraine-russia war : रशियाचा युक्रेनमधील लष्करी तळावर हल्ला : ९ ठार | पुढारी

ukraine-russia war : रशियाचा युक्रेनमधील लष्करी तळावर हल्ला : ९ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियन सैन्याने युक्रेनमधील ल्‍विव्‍हमधील लष्करी तळावर आज (रविवार) जोरदार हल्ला (ukraine russia war) केला आहे. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या हल्ल्यात रशियाने किमान ८ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला जात आहे.

रशिया – युक्रेनमध्ये मागील १८ दिवसांपासून प्रचंड संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशाकडून अद्यापही युद्ध संपण्याची काही संकेत मिळत नाही. रशियाच्या सैन्यांकडून युक्रेनमधील शहरावरील हल्ले अजुनही सुरू आहेत. तर या हल्ल्यांनाही युक्रेनच्या सैनिकांकडून जोरदार प्रतिकार केला जात आहे. तर १३ हजार रशियन सैनिकांना मारल्याचा दावा युक्रेन लष्कराने केला आहे. तर दुसरीकडे युक्रेनला २० कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

दरम्यान, रशियन सैनिकांनी युद्धग्रस्त प्रदेशातून बाहेर काढत असलेल्या नागरिकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप युक्रेनच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडीओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button