

सातारा : पुढारी वृत्तसेवा
साताऱ्यात वाई तालुक्यातील पसरणी येथे भैरवनाथ नगर येथे काल दुपारी (शुक्रवार, दिनांक ११ मार्च) उसाची तोड सुरू होती. ऊस तोड झाल्यानंतर उसाने भरलेला ट्रक साखर कारखान्याकडे जात असताना धोम धरणाच्या डाव्या कालव्यात संपूर्ण ट्रक कोसळला.
कडेच्या रस्त्यावर चढ-उतार असल्याने तोल एका बाजूला जाऊन कालव्यात उसाने भरलेला ट्रक कोसळला. ही माहिती कालवा समितीला समजतच कालव्यातील पाणी कमी करण्यात आले. रात्री उशिरा ट्रक कालव्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेत ट्रकचे आणि उसाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचलंत का?