shane warne death : वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरचे भावनिक ट्विट, म्हणाला…

shane warne death : वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरचे भावनिक ट्विट, म्हणाला...
shane warne death : वॉर्नच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरचे भावनिक ट्विट, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (shane warne death) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वाला हादरा बसला आहे. वॉर्न यांनी ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट पटकावल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ बळी घेतले. त्याने प्रथम श्रेणीत १३१९ विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर कसोटी क्रिकेटमध्ये ते सर्वाधिक बळी घेणारे दुसरे गोलंदाज होते. वॉर्न यांच्या निधनानंतर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वॉर्नच्या (shane warne death) निधनानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे. भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, वसीम जाफर यांनी वॉर्न यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटले आहे की,

हैराण, स्तब्ध आणि दयनीय…

वॉर्नी तुझी आठवण येईल. तुझ्या आजूबाजूला, मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही नीरस क्षण नव्हता. आमची ऑन फील्ड द्वंद्वयुद्धे आणि मैदानाबाहेरची खेळाडूवृत्ती नेहमीच टिकून राहील. भारतासाठी तुझे नेहमीच खास स्थान होते आणि भारतीयांचे तुझ्यासाठी एक खास स्थान होते.

वॉर्न (shane warne death) यांनी आपल्या मुलाखतीत अनेकवेळा हे देखील नमूद केले होते की, सचिन स्वप्नात त्याच्या डोक्यावर षटकार मारताना दिसतो. १३ सप्टेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे जन्मलेल्या शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ७०० बळी घेणारा वॉर्न हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news