shane warne : शेन वॉर्न यांचा पहिला बळी होता भारताचा ‘हा’ महान खेळाडू!

shane warne : शेन वॉर्न यांचा पहिला बळी होता भारताचा ‘हा’ खेळाडू!
shane warne : शेन वॉर्न यांचा पहिला बळी होता भारताचा ‘हा’ खेळाडू!

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2 जानेवारी 1992 या दिवशी 'फिरकीचा जादूगार' आणि ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांनी (shane warne) कसोटी पदार्पण केले. 1992 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शेन वॉर्न यांनी 15 वर्षे क्रिकेटमध्ये आपली गोलंदाजीची राजवट कायम ठेवली आणि जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये आपले स्थान निर्माण केले. वॉर्न यांनी टाकलेले चेंडू क्रिकेटच्या इतिहासात अजरामर आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असाच एक चेंडू टाकला आहे, जो संपूर्ण क्रिकेट इतिहासातील सर्वात नेत्रदीपक चेंडू मानला जातो. शेन वॉर्नच्या या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'चा किताब मिळाला आहे.

शेन वॉर्न (shane warne) हे जगातील एकमेव असा गोलंदाज आहेत ज्यांनी 3 देशांविरुद्ध 100 हून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. शेन वॉर्न यांनी इंग्लंडविरुद्ध 195, न्यूझीलंडविरुद्ध 103 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 130 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1001 विकेट्स पटकावल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारे ते दुसरे खेळाडू ठरले. वॉर्नने कसोटी कारकिर्दीत 708 तर वनडेत 293 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्न हे कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारे पहिला खेळाडू होते. मात्र, नंतर त्यांचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने मोडला.

भारताचे रवी शास्त्री हे शेन वॉर्न (shane warne) यांचा पहिला बळी…

2 जानेवारी 1992 रोजी कसोटी पदार्पण करणाऱ्या शेन वॉर्नने (shane warne) पदार्पणाच्या सामन्यात केवळ एक विकेट घेतली. 'रिस्ट विझार्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या सामन्यात त्यांना एकच विकेट मिळाली आणि ती विकेट रवी शास्त्री यांची होती. या कसोटीत वॉर्न यांनी 1 विकेटसाठी 150 धावा दिल्या. त्या सामन्यात रवी शास्त्री यांनी द्विशतकी खेळी साकारली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news