INDvsNZ : भारताचा न्यूझीलंडवर विजय, क्लीन स्विप टाळला | पुढारी

INDvsNZ : भारताचा न्यूझीलंडवर विजय, क्लीन स्विप टाळला

पुढारी, ऑनलाईन डेस्क : क्वीन्सटाऊनच्या मैदानावर झालेल्या भारत- न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूध्दच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवत क्लीन स्विपची नामुष्की टाळली. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताला चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु, मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून भारताने शेवट गोड केला. भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मंधाना (७१) आणि हरमनप्रीत कौर (६३) यांनी निर्णायक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Gold prices : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने कडाडले; १० ग्रॅमचा दर ५२ हजारांच्या समीप

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांत ९ विकेट गमावून न्यूझीलंडने भारतासमोर (India vs New Zealand) २५१ धावांचे माफक आव्हान ठेवले. एमेलिया केरने ७५ चेंडूत ६६ धावा केल्या. तर सोफी डिवाइन (३४), लॉरेन डाउन (३०) और हेली जेन्सेन (३०) धावा केल्या. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वेगवान गोलंदाज मेघना सिंगने चांगली गोलंदाजी केली.

नाशिक : नानासाहेबांचा मोबाइल फेकला ठाणे जिल्ह्यातील खाडीत, शोध लागेना

यजमान संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ४६ षटकांमध्ये ४ गडी बाद करत २५५ धावा केल्या आणि ६ विकेटने सामना खिशात घातला. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारली. स्मृती मंधानाने ८४ चेंडूत ७१, हरमनप्रीत कौरने ६६ चेंडूत ६३, तर मिताली राजने ६६ चेंडूत ५७ धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या हेली जेन्सन, हॅना रोवे, फ्रॅन जोनास, अमेलिया केर यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

या दौऱ्यात पहिल्या ४ एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर शेवटच्या पाचव्या सामन्यात भारताचा पराभव होऊन क्लिन स्विप मिळतो की काय अशी शंका होती. पण भारतीय खेळीडूंनी चांगला खेळ करून शेवटचा सामन्यात विजय मिळवल. याचबरोबर यजमान न्यूझीलंड संघाने ही मालिका ४-१ ने जिंकली.

हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button