सौरभ चौधरी : अंतिम फेरीत सातव्या स्थानी

सौरभ चौधरी ने १० मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात अंतिम फेरीत स्‍थान निश्‍चित केले.
सौरभ चौधरी ने १० मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात अंतिम फेरीत स्‍थान निश्‍चित केले.
Published on
Updated on

टाेकियाे; पुढारी ऑनलाईन:  सौरभ चौधरी याने १० मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात अंतिम फेरीतील स्‍थान निश्‍चित केले होते. त्यानंतर तो अभिनव बिंद्रासारखीच सुवर्ण पदकाला गवसणी घालणार अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अंतिम फेरीत तो सातव्या स्थानी राहिला आणि शुटिंगमधला अपेक्षाभंग झाला.

सौरव चौधरी पात्रता फेरीत सुरुवातीला मागे राहिला होता. मात्र सलग अचूक निशाणा साधत अग्रस्‍थान फटकावले. पात्रता फेरीत सौरभने ५८६ अंक आपल्‍या नावावर केले. तो अंतिम फेरीत पोहचल्यानंतर भारत आजच्या दिवशी आपले दुसरे पदक मिळवेल असे वाटत होते. मात्र मोठ्या अपेक्षा असलेला सौरभ अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करु शकला नाही.

अधिक वाचा 

मात्र या फेरीत भारताचा अभिषेक वर्मा पिछाडीवर राहिला. अभिषेक हा १७व्‍या स्‍थानी राहिल्‍याने त्‍याचा अंतिम फेरीत प्रवेशाची अशा संपुष्‍टात आली आहे.

पात्रता फेरीत सौरभची सुरुवात समाधानकारक झाली नाही. मात्र नंतर त्‍याने आपल्‍या सर्वोत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. या फेरीत तो अग्रस्‍थानी राहिला. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे भारताच्‍या पदकाच्‍या आशा पल्‍लवित झाल्‍या आहेत.

अधिक वाचा 

पात्रता फेरीत सौरभची सुरुवात समाधानकारक झाली नाही. मात्र नंतर त्‍याने आपल्‍या सर्वोत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले.

सर्व सहा फैर्‍यांमध्‍ये सरसरी ९५पेक्षा अधिक अंक त्‍याने आपल्‍या नावावर केले.

तीन फैर्‍यांमध्‍ये ९८ अंक कमावले.चौथ्‍या फेरीत सर्वोत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करीत १०० अंक मिळवले. पात्रता फेरीत एकाही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही.

पाचव्‍या व सहाव्‍या फेरीत त्‍याने अनुक्रमे ९८ व ९७ अंक कमवत ५८६ अंक मिळवत तो पात्रता फेरीत अग्रस्‍थानी राहिला.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news