PAKvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर | पुढारी

PAKvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

कराची; पुढारी ऑनलाईन : PAK vs AUS : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची आज (दि. 9) घोषणा केली. या संघात १६ जणांसह पाच राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करत आहे. उभय संघांदरम्यान रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे सामने खेळले जाणार आहेत.

पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर संघात तीन बदल केले आहेत. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे कसोटीसाठी संघात असलेला हारिस रौफ ऑफस्पिनर बिलाल आसिफच्या जागी परतला आहे, तर शान मसूदने आबिद अलीच्या जागी संघात पुनरागमन केले आहे. 2020-21 च्या मोसमात तो न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना खेळला होता. प्रकृती खराब असल्याने आबिद बाहेर आहे. तर यासिर शाहला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट याची पाकच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (PAK vs AUS)

पाकिस्तान सुपर लीग 2022 (PSL 2022) मध्ये खेळत नसलेले कसोटीपटू 16 फेब्रुवारी रोजी कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित सराव शिबिरासाठी जमतील. मुख्य निवडकर्ते मुहम्मद वसीम म्हणाले, ‘आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मायदेशातील मालिकेसाठी पुढे जाण्याचा पर्याय निवडला आहे आणि आवश्यकतेनुसारच बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंनी आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कसोटी क्रिकेटसाठी प्रभावी कामगिरी करणे गरजेचे आहे त्यातून भविष्यासाठी संघ तयार करणे सोपे जाईल’, असे त्यांनी सांगितले आहे. (PAK vs AUS)

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, सकलेन मुश्ताक पुढील 12 महिन्यांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शॉन टेटला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि मोहम्मद युसूफ फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

असा आहे पाकिस्तान संघ.. (PAK vs AUS)

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, अझहर अलु, फहीम अश्रफ, फवाद आलम, हारिस रौफ, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, नौमान अली, साजिद खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, जाहिद महमूद.

Back to top button