PAK vs AUS : पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर! | पुढारी

PAK vs AUS : पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे (PAK vs AUS). ही मालिका मार्च 2022 मध्ये आयोजित केली जाईल. या मालिकेत 3 कसोटी, 3 वनडे आणि एक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे देण्यात आले आहे. तर स्टीव्ह स्मिथ संघाचा उपकर्णधार असेल.

वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड आणि फलंदाज उस्मान ख्वाजा यांना ॲशेस मालिकेतील चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले असून, या दोघांनाही पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाचा भाग बनवण्यात आले आहे. ख्वाजाने अॅशेस मालिकेतील 2 सामन्यात 255 धावा केल्या होत्या. तर, बोलंडने 3 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या. (PAK vs AUS)

ॲशेस मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान दौऱ्याबाबत हेझलवूडच्या एका वक्तव्याची खूप चर्चा झाली होती. वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे तो म्हणाला होता. (PAK vs AUS)

गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौराही रद्द झाल्याच्या बातम्या येत होत्या, पण तसे झाले नाही. 4 फेब्रुवारी रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बैठकीत पाकिस्तान दौऱ्याच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. (PAK vs AUS)

या दौऱ्याला मंजुरी मिळाल्यानंतर, ऑस्ट्रेलिया बोर्डाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले म्हणाले, मी पीसीबीसह पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही सरकारांचे आभार मानतो, ज्यामुळे 24 वर्षांमध्ये प्रथमच दौरा पार पडत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 1998 नंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. तेव्हा मार्क टेलर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. (PAK vs AUS)

रावळपिंडीत पाच सामने खेळवले जाणार (PAK vs AUS)

या मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडीत ४ मार्चपासून खेळवला जाणार आहे. शेवटचे दोन कसोटी सामने कराची आणि लाहोर येथे होणार आहेत. रावळपिंडीत तीन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळण्यात येणार आहे. उभय संघांमधील सात सामन्यांपैकी पाच सामने हे रावळपिंडी येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाचा संघ 27 फेब्रुवारीला इस्लामाबादला पोहोचणार असून येथे सर्व खेळाडू एक दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. (PAK vs AUS)

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे… (PAK vs AUS)

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅलेक्स कॅरी, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, मार्कस हॅरिस, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, स्कॉट बोलँड, अॅस्टन अगर, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.

Back to top button