KL Rahul : राहुल लखनौचा नवाब; मार्कस स्टोईनिस, रवी बिश्‍नोई यांचाही समावेश | पुढारी

KL Rahul : राहुल लखनौचा नवाब; मार्कस स्टोईनिस, रवी बिश्‍नोई यांचाही समावेश

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : ‘आयपीएल-2022’मध्ये मेगा लिलावापूर्वी लखनौ फ्रँचाईजीने भारतीय सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul), अनकॅप्ड भारतीय खेळाडू रवी बिश्‍नोई आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्कस स्टोईनिस यांना आपल्या संघात सामील केले आहे. के. एल. राहुल लखनौ संघाचा कर्णधारही असेल.

लखनौ फ्रँचाईजीने के. एल. राहुलला (KL Rahul) 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. दोन मोसमात चांगली कामगिरी करणारा लेगस्पिनर रवी बिश्‍नोईला 4 कोटी रुपये मिळणार आहेत. लखनौ फ्रँचाईजीने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्‍ती केली आहे. (KL Rahul)

याआधी ते पंजाब किंग्जचे साहाय्यक प्रशिक्षक होते. गौतम गंभीरला संघाचा मेंटॉर करण्यात आले आहे. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले आहे. हा संघ टी-20 लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे. आरपीएसजी ग्रुपने 7090 कोटी रुपयांना संघ विकत घेतला आहे. (KL Rahul)

अहमदाबाद आणि लखनौ या नव्याने दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचाईजींचे प्रत्येकी 3 खेळाडू जवळपास निश्‍चित झाले आहेत. या दोन्ही फ्रँचाईजींनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी यात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. अहमदाबाद व लखनौ यांनी बीसीसीआयने मेगा ऑक्शनसाठी दिलेल्या 90 कोटींच्या बजेटमधून प्रत्येकी 3 खेळाडूंना करारबद्ध करताना अनुक्रमे 53 व 60 कोटी वाचवले आहेत. मात्र, आयपीएल मेगा ऑक्शनसाठी सर्वाधिक रक्‍कम कोणाच्या बटव्यात उरली आहे, ते पाहू. (KL Rahul)

पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (14 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी); शिल्लक रक्‍कम : 72 कोटी.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उम्रान मलिक (4 कोटी); शिल्लक रक्‍कम : 68 कोटी.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी), यशस्वी जैस्वाल (4 कोटी); शिल्लक रक्‍कम : 62 कोटी.

लखनौ : लोकेश राहुल (15 कोटी), मार्कस स्टोईनिस (11 कोटी) व रवी बिश्‍नोई (4 कोटी); शिल्लक रक्‍कम : 60 कोटी.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी); शिल्लक रक्‍कम : 57 कोटी.

अहमदाबाद : हार्दिक पंड्या (15 कोटी), राशीद खान (15 कोटी), शुभमन गिल (7 कोटी); शिल्लक रक्‍कम : 53 कोटी.

चेन्‍नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), मोईन अली (8 कोटी); शिल्लक रक्‍कम : 48 कोटी.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (14 कोटी), केरॉन पोलार्ड (6 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी); शिल्लक रक्‍कम : 48 कोटी.

कोलकाता नाईट रायडर्स : आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नरायण (6 कोटी); शिल्लक रक्‍कम : 48 कोटी.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (12 कोटी), पृथ्वी शॉ (8 कोटी), एन्‍रिच नॉर्त्जे (6 कोटी); शिल्लक रक्‍कम : 47 कोटी.

Back to top button