Navdeep kaur : मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत नवदीप कौरने केले भारताचे प्रतिनिधीत्व | पुढारी

Navdeep kaur : मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत नवदीप कौरने केले भारताचे प्रतिनिधीत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिसेस इंडिया २०२१ ची विजेती नवदीप कौर (Navdeep kaur) लास वेगासमध्ये मिसेस वर्ल्ड २०२२ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. ही स्पर्धा १५ जानेवारीला रोजी सुरु झाली आहे. लवकरच या स्पर्धेचे निकाल लागणार आहेत. नवदिप कौरने मिसेस इंडिया हा किताब २०२१ साली जिंकला होता. यावेळी तिने इतिहास रचला होता. कारण ती सौंदर्याच्या जगातून आलेली नाही. तर ओडिशातील रौकेला या छोट्या शहरातून आली आहे. तेथूनच त्यांनी शिक्षण घेतले आहे. नवदीप कौर म्हणजे सौंदर्य आणि मेंदू यांचा मिलाफ आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत नवदीप कौर.

नवदीप कौरने (Navdeep kaur) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केले आहे. आणि एमबीएची डिग्री घेतली आहे. तिने एका बँकेत असिस्टंट प्रोफेसरची नोकरी केली.

नवदीप कौरचा विवाह ७ वर्षापूर्वी झाला आहे. ६ वर्षांची एक मुलगी आहे. कामानंतर नवदीप मुलांना शिकवते. नवदीप लेडीज सर्कल इंडियाची दूत आहे. १००० मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नवदीप महिन्याच्या शेवटी काही दिवस मतिमंद मुलांनाही शिकवते आणि ग्रामीण भागातील मुलांना वैयक्तिक विकासाचे प्रशिक्षण देते.

एका मुलाखतीत तिने (Navdeep kaur) सांगितले की, मी अशा मुलींपैकी एक आहे ज्यांना या व्यवसायात येण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे जेव्हा-जेव्हा तयारीचा विषय आला तेव्हा मी कोणतीही कसर सोडली नाही. मला २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत आहे. तिला मिसेस वर्ल्ड २०२२ चा किताब जिंकताना पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत.
नवदीप (Navdeep kaur) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचलत का? 

Back to top button