Siddharth and Saina : अश्‍लील ट्विट प्रकरणी अभिनेता सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी - पुढारी

Siddharth and Saina : अश्‍लील ट्विट प्रकरणी अभिनेता सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
अश्‍लील ट्विट प्रकरणी ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थने बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ( Siddharth and Saina ) हिची माफी मागितली आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब दौरा केला. यावेळी त्‍यांच्‍या सुरक्षेत त्रुटी राहिल्‍या होत्‍या. या घटनेवर सायन नेहवाल हिने ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून चिंता व्‍यक्‍त केली होती. यावर अभिनेता सिद्धार्थ याने अश्‍लील ट्विट केले होते. यामुळे सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. आता माफी मागत  त्‍याने या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

सिद्धार्थ याने ट्‍विट केलेल्‍या माफीनाम्‍यात म्‍हटलं आहे की, मी तुमच्‍या मतांशी असहमत असू शकतो;पण माझी निराशा आणि तुमचे ट्‍विट वाचून आलेला राग यामुळे मी व्‍यक्‍त केलेले असभ्‍य शब्‍द योग्‍य ठरत नाहीत. मी तुमची माफी मागतो. मी माझ्‍या शब्‍दाच्‍या निवड व गंमत यावर भर देणे गरजेचे होते.

Siddharth and Saina : तुम्‍ही नेहमीच माझ्‍यासाठी चॅम्‍पियन राहिला आहात

माफीनाम्‍यात शेवटी सिद्धार्थने लिहले आहे की, मी कोणताही वाईट हेतू ठेवून हे ट्‍विट केले नव्‍हते. मी स्‍वत: कट्‍टर स्‍त्रीवादी आहे. मी केलेले टिविट हे महिलांच्‍या विरोधात नव्‍हते. मला कोणाचाही अवमान करायचा नव्‍हता. तसेच त्‍यांचा अवमान करण्‍याचा माझा हेतू नव्‍हता. मला आशा आहे की, तुम्‍ही सर्व विवाद विसरुन माझा माफीनाम्‍याचा स्‍वीकार कराल. तुम्‍ही नेहमीच माझ्‍यासाठी चॅम्‍पियन राहिला आहात.

 

हेही वाचलं का? 

 

Back to top button