

पुढारी ऑनलाईन डेस्क: कचऱ्याची समस्या ही केवळ पृथ्वीवरच नाही, तर अवकाशातही आहे. आकाशातील कचऱ्याची समस्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पृथ्वीच्या कक्षेत माणसाने बनवलेल्या अनेक कृत्रिम उपग्रह आणि मोहिमांतून निर्माण झालेल्या वस्तू वेळ आणि उद्देश पूर्ण होऊन देखील अवकाशात फिरत आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार, अंतराळात सुमारे 8,400 टन कचरा आहे. त्यापैकी बहुतेक 18,000 ते 28,000 मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. एकही वस्तू कुठेतरी पडली तर तिथे प्रचंड विध्वंस (Space Debris) होऊ शकतो,असेही नासाने म्हटलं आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर रॉकेट अवकाशातच राहतात. रॉकेटचा फॉरवर्ड कोन, पेलोड कव्हर, बोल्ट्स आणि मोठ्या प्रमाणात भरलेल्या इंधन टाक्या, बॅटरी आणि इतर पार्टच्या मोडतोड अवशेष ढिगाऱ्याचा कचरा अवकाशात मोठ्या प्रमाणात (Space Debris) आढळून येतो.
नासाच्या मतानुसार, सध्या २० हजारांहून अधिक लहान-मोठी उपकरणे अवकाशात कचऱ्याच्या स्वरूपात दिसून येत आहेत. ती पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सतत फिरत आहेत. अंतराळातील हा कचऱ्याचा ढिगारा कमी झाल्यास, उपग्रह पाठवणे आणि मानवी अंतराळ मोहिमांतील जोखीम (समस्या) कमी करण्यास मदत करू शकते, असेही नासाने (Space Debris) म्हटले आहे.
सध्या अंतराळात रशियाचे 7032, अमेरिका-5216, चीन- 3854, फ्रान्स- 520, जपान- 117 आणि भारताचे 114 उपग्रह आणि रॉकेट्स आहेत. अवकाशात १ ते १० सेंमीच्या भागात ५ लाख टनपेक्षा अधिक कचरा आहे. दिवसेंदिवस अंतराळ उद्योगाचा वेगाने विकास होत राहिल्याने अवकाशातील कचऱ्याचा ढिगारा वाढतच जाणार असल्याचेही नासाने नमूद केले आहे.
नासाच्या मते अवकाशात भारताचे 206 तुकडे आहेत. त्यापैकी 89 तुकडे पेलोडचे आणि 117 तुकडे रॉकेटचे आहेत. तर चीनचा अवकाशातील कचरा ढिगारा हा भारतापेक्षा 20 पट अधिक आहे. चीनचे अवकाशात सुमारे 3,987 तुकडे फिरत आहेत. या वस्तू 0.11 सेमीपासून अधिक मोठ्या देखील असू शकतात. या कचऱ्यातील एखादीही अवजड वस्तू पृथ्वीवरकुठेतरी पडली तर तिथे प्रचंड विध्वंस होऊ शकतो, असेही नासाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
अंतरिक्षात अनेक प्रयोग करणाऱ्या देशांनी अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अवकाशातील कचरा कमी करण्याासाठी एकेरी वापरल्या जाणार्या रॉकेटऐवजी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे अवकाश उपग्रह प्रक्षेपण आणि मोहिमांदरम्यान नवीन अवकाश कचरा निर्मितीचे प्रमाण कमी करण्यात मदत होऊ शकते. तसेच साहित्य आणि डिझाइनमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अधिक टिकाऊ साहित्य वापरल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असेही नासाने दिलेल्या माहित म्हटले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) देखील अंतराळ वातावरणावर वाढत्या अवकाशातील ढिगाऱ्यांच्या परिणामांवर अभ्यास करत असल्याची माहिती दिली आहे.
अवकाशात प्रदूषण आणि गर्दी दोन्ही आहे आणि हे सर्व मानवनिर्मित आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या 2023 च्या मूल्यांकनानुसार, अवकाशातील 27,000 वस्तू सूचीबद्ध आहेत, त्यापैकी बहुतांशी 80 टक्के हा अवकाशातील उपग्रह आणि मोहिमेतून फेकला गेलेल्या वस्तूंच्या अवशेषांचा ढिगारा आहे. तसेच अवकाशात १० सेमीपेक्षा कमी आकाराच्या लाखो स्पेस ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांची सूचीबद्धता नाही. पण हे अंतराळ या निरोपयोगी अवकाश वस्तूंमुळे अवकाशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिल्याचे वृत्त 'एनडीटिव्ही'ने दिले आहे.
हेही वाचा :