hamsa nandini : मी दु:खालाही जुमानत नाही, ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट

actress hamsa nandini
actress hamsa nandini
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

सामान्य महिलांसोबतचं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी कॅन्सरशी लढा दिलाय. यामध्‍ये सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला, लीजा रे या अभिनेत्रींचा समावेश आहे. आता एका साऊथच्‍या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे-हमसा नंदिनी. हमसा नंदिनी हिला तमाम चित्रपटांमध्ये हिट गाण्यांवर थिरकताना पाहण्यात आलंय. ती आपल्या आयुष्यात खूप आनंदात होती. पण, तिच्या आयुष्यात मन हेलावणारी घटना घडली आणि तिचं आयुष्यचं बदलून गेलं.

हमसला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंय. तिने काही दिवसांपूर्वी आपला ३७ वा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. हमसाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. ती कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. तिने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केलीय. हमसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाेल्ड लुकमधील काही ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.

तिने एक मोठी पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये तिने लिहिलंय की, तिला कशाप्रकारे ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती झालं. १८ वर्षांपूर्वी हमसाच्या आईचेही निधन ब्रेस्ट कॅन्सरमुळे जालं होतं. तेव्हा पासून ती भीतीच्या छायेत जगत होती. पण, ही भीती खरी ठरली. जेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं.

हमसा नंदिनीने पोस्टमध्ये लिहिलंय-

आयुष्यात माझ्यावर कितीही संकटे आली, कितीही अन्याय झाला. तरीही मी बळी पडणार नाही. मी भीती, निराशावाद आणि नकारात्मकतेला नकार देते. धैर्य आणि प्रेमाने, मी पुढे चालत राहीन.

चार महिन्यांपूर्वी, मला माझ्या स्तनामध्ये एक लहान गाठ आढळली. त्याच क्षणी मला माहित होते की माझे आयुष्य कधीही पूर्वीसारखे होणार नाही. १८ वर्षांपूर्वी मी माझ्या आईला एका भयानक आजाराने गमावले होते आणि तेव्हापासून मी भीतीच्या छायेत जगत होतो. मी घाबरले होते. 

मी मॅमोग्राफी क्लिनिकमध्ये गाठ तपासण्यासाठी गेले होते. तेव्हा मला ताबडतोब सर्जिकल ऑन्कोलॉजिस्टला भेटण्यास सांगितले गेले. त्यांनी मला बायोप्सीची आवश्यकता असल्याचे सुचवले. बायोप्सीने माझ्या सर्व भीतीची पुष्टी केली आणि मला ग्रेड थर्ड स्तन कर्करोग असल्याचे निदान झाले.

अनेक स्कॅन्स आणि चाचण्यांनंतर, मी धैर्याने ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. तिथे माझा ट्यूमर काढला गेला. यावेळी, डॉक्टरांनी पुष्टी केली की, कोणताही प्रसार झाला नाही आणि मी भाग्यवान आहे.

पण, मला माझ्या संपूर्ण आयुष्यात पुन्हा स्तनाचा कर्करोग होण्याची ७० टक्के शक्यता आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाची ४५ टक्के शक्यता आहे. आता ऑपरेशन्सन मला करावे लागेल. सध्या, मी ९ वेळा केमोथेरपी घेतलीय. अजून ७ बाकी आहेत.

मी स्वतःला काही वचने दिली आहेत:-

मी या आजाराशी लढेन. मी हसून त्याच्याशी लढेन.

मी पुन्हा चांगली होऊन पडद्यावर येईन.

मी जीवन चांगल्या पध्दतीने जगेल.माझे इनबॉक्स माझी चौकशी करणाऱ्या तुमच्या संदेशांनी भरलेले आहेत. तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल तुमचे खूप आभार. मी डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली आहे. मी लढा देत आहे.

प्रेम,
हमसा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news