Mamata Banerjee And Sourav Ganguly : ममता बॅनर्जी म्हणाल्या, सौरव गांगुलीला जाणीवपूर्वक एकटे पाडले

Mamata Banerjee And Sourav Ganguly : ममता बॅनर्जी म्हणाल्या, सौरव गांगुलीला जाणीवपूर्वक एकटे पाडले
Published on
Updated on

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगली यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपद निवडणुकीतून जाणिवपुर्वक बाजूला केले गेले आहे. यावेळी पश्चीम बंगाच्या दौऱ्यापुर्वी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे की, त्यांनी सौरव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची परवानगी दिली जावी. (Mamata Banerjee And Sourav Ganguly)

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, सौरव गांगुली यांनी स्वत:ला एक उत्तम प्रशासक म्हणून सिद्ध केले आहे. त्यांना बीसीसीआय अध्यक्षपदावरुन बाजूला करण्यात आल्या मी अवाक झाले आहे. गांगुली यांच्यासोबत अन्याय करण्यात आला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रहाची विनंती करते की, त्यांनी सौरव गांगुली यांना आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची संधी मिळेल. शिवाय ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या, अशा प्रकरणात राजकारण होऊ नये. (Mamata Banerjee And Sourav Ganguly)

१९८३ साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे सौरव गांगुली यांच्या जागी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार असल्याचे जवळजवळ निश्चीत झाले आहे. अशा वेळी पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठीच बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणूकीपासून दूर राहिला असल्याचे बोलले जात होते. पण, ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयमध्ये राजकारण शिजते आहे का ? आणि याच राजकारणाचा बळी सौरव गांगुली ठरला आहे का ? अशी शंका येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडणूक लढणार आहे. (Mamata Banerjee And Sourav Ganguly)

२० ऑक्टोंबर रोजी आयसीसीच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहे. येणाऱ्या बातम्यांनुसार सोरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहणार होते पण, त्यांना इतर सदस्यांकडून समर्थन मिळाले नाही. आता बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळातून सौरव गांगुली बाहेर पडले असतले तरी गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह बीसीसीआयच्या सचिव पदी कायम राहणार आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news