पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या खास फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधीकधी उर्फीला ट्रोलही केले जाते. कधीकधी ती नेटकऱ्यांना सडेतोड प्रतिउत्तर देत असते. याच दरम्यान सध्या तिच्या आणखी एक व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. यावेळी तिच्या फॅशनने नव्हे तर तिच्या गाढ झोपेची जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) गेल्या दोन दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. या बर्थडे पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. याच दरम्यान उर्फीचा आणखी एक धमोकदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात चक्क उर्फी स्वत: च्याच पार्टीत गाढ, शांत झोपलेली दिसतेय.
बॉस ओटीटीच्या एका पार्टी दरम्यान उर्फी जावेद सोफ्यावर आरामात झोपलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उर्फीचे मैत्रमित्रिणी पार्टीमध्ये धमाकेदार गाण्यावर डान्स करत आहेत, तर फॅशन आयकॉन उर्फी मात्र, सोफ्यावर आराम करताना दिसतेय. यासोबत तिच्या जवळ एक काचेचा ग्लास, टेबल आणि खुर्ची दिसतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'वाढदिवसाची अपेक्षा विरुद्ध वास्तविकता. मी इतकी थकले होते की, मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही'. असे लिहिले आहे.
हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'चक्क उर्फी स्वत : पार्टीत झोपली आहे का?', 'हे असे कसे काय होते?', 'उर्फी दारूच्या नशेत आहे का?', 'इतकी कशी काय थकली आहे?', 'आता तिची फॅशन कोठे गेली?', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ८० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचलंत का?