बिग बॉस मराठी सिझन चौथा डे १४ : योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो : किरण माने! | पुढारी

बिग बॉस मराठी सिझन चौथा डे १४ : योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो : किरण माने!

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य “फटा पोश्टर निकला झिरो”. ज्याबद्दल किरण माने आणि तेजस्विनीमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. किरण माने तेजस्विनीला सांगताना दिसणार आहे की, “मी विकासला सांगितलं आहे, माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीतर मी त्याला देखील नॉमिनेट करणार… तिथे मित्र नाही कि कोणी नाही… तो आता माझ्यासाठी झटतो आहे. माझी एक अट आहे, योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो. आणि हे पूर्ण नाही झालं तर विकास नॉमिनेट झाला तरी मला हरकत नाही”.

तेजस्विनी तिची बाजू मांडताना म्हणतो की, “माझं तुमच्याशी असं काही वैयक्तिक भांडण नाहीये. योगेशने प्रसादला नॉमिनेट करावं हे वेगळे आहे. जर तुम्ही तसं नाही तर मला विकासाला नाईलाजाने नॉमिनेट करावं लागेल”. त्यावर किरण यांचे म्हणणे आहे, “पण हिच माझी डील आहे.”

आता किरण यांच्या डीलमुळे विकास नॉमिनेट होईल? कि तेजस्विनी योगेशला सांगून प्रसादला नॉमिनेट करवेल. या सगळ्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होईल? आणि कोण सेफ होईल? किरण आणि विकासच्या यांच्या मैत्रीत दुरावा येईल? हे बिग बॉस मराठीच्या पुढील भागात समजणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button