सैयामीचा प्रशिक्षक बनणार अभिषेक

सैयामीचा प्रशिक्षक बनणार अभिषेक

पुढारी ऑनलाईन

अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील वेबसीरिज 'ब्रीद'च्या दुसर्‍या सीझनमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता आर. बाल्कीच्या 'घुमर'मध्ये हे दोघे काम करत आहेत. यात अभिषेकने क्रिकेटचा प्रशिक्षक साकारला आहे. तर सैयामी एक क्रिकेटर आहे. खरेतर सैयामी ही प्रत्यक्षात एक क्रिकेटपटूच होती. ती महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट टीममध्ये होती. त्यामुळे अभिषेक तिला केवळ पडद्यावर क्रिकेट खेळायला शिकवेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, या चित्रपटात शबाना आझमी यांचीही भूमिका आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news