सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची  गाजलेली केमिस्ट्री

सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची गाजलेली केमिस्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त ऐकून टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. सिध्दार्थ आणि शहनाज गिल एकत्र 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसले होते. सिध्दार्थ आणि शहनाज गिल या दोघांची केमिस्ट्री अफलातून होती.

शुक्लाने २००८ मध्ये टीव्ही मालिका 'बाबुल का आंगन छूटे ना'तून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'जाने पहचाने से अजनबी', 'सीआयडी', 'बालिका वधू' आणि 'लव्ह यू जिंदगी' टीव्ही शोज आणि अनेक रिॲलिटी शोजमध्ये दिसला.

'बिग बॉस-१३'मेध्ये शुक्ला आणि गिल यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. चाहते त्याला प्रेमाने 'सिडनाज' म्हमून बोलवायचे. दोघे एकत्र स्क्रिनवर कधी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या शोनंतर शुक्लाची लोकप्रियता प्रचंड वाढली.

गिल आणि शुक्लाची अफलातून केमिस्ट्री

सिध्दार्थने एका शोमध्ये म्हटलं होतं.-गिल सोबत माझी मैत्री वेगळी आहे. ती स्वच्छ मनाची आहे. तिला समजून घेणारा नवरा पाहिजे. तर एकदा एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं. – 'त्याच्यासोबत माझं नातं वेगऴं आहे, तो माझ्या फॅमिलीसारखा आहे.'

गिल व शुक्लाला लोक सिडनाज नावाने बोलवायचे. परंतु, आता ही जोडी तुटली. सिध्दार्थ शुक्लाने या जगाला अलविदा म्हटलं आहे.

सिडनाजच्या जोडीवर शहनाजने म्हटलं होतं.- 'सिडनाज आताही एक गोष्ट का आहे. यामागे एकमेव रहस्य आहे की, हे वास्तविक आहे. आम्ही एक प्‍युअर रिलेशनशीप शेअर केली आहे. ज्याप्रकारे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. मला वास्तवात हे खूप चांगलं वाटलं. आमच्या एकमेकांसाठीच्या भावना एकसारख्या होत्या.'

शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. शुक्ला हा बिग बॉसच्या १३ चा विजेता होता. मुंबईतील कूपर रुग्णालयात गुरुवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, बॉलिवूडमधील 'धक् धक् गर्ल' माधुरी दीक्षित, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री रश्मी देसाई हिच्यासह अनेक कलाकारांनी टविट्रवर शोक व्यक्त केला आहे.

माधुरी दीक्षितने टविटरवर एक पोस्ट शेअर करत 'हे एक अविश्वसनीय आणि धक्कादायक वृत्त आहे. सिद्धार्थ शुक्ला तुमची नेहमी आठवण येत राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबाप्रती माझी मनःपूर्वक संवेदना' अशा शब्दांत शोक व्यक्त केला.

रितेश देशमुखने ट्विटरवर व्यक्त करत लिहिले आहे की, 'शब्दांच्या पलीकडचा धक्का बसला आहे. इतक्या लवकरच तु निघून जाईल असे वाटले नव्हते.

तुमच्या कुटुंबाला, प्रियजनांना संवेदना.त्याच्यावर लाखो चाहत्यांचे प्रेम करत होते. #सिद्धार्थ शुक्ला तुमची आठवण येईल. तुमच्या आत्मास शांती लाभो. ओम शांती.'

हेही वाचलं का ?

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

logo
Pudhari News
pudhari.news