शाहिदचा ‘फर्जी’

शाहीद कपूर
शाहीद कपूर
Published on
Updated on

शाहिद कपूर एकेकाळी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर होता. आता शाहिदचा समावेश बॉलीवूडच्या टॉप-5 सर्वोत्कृष्ट अभिनेता डान्सरमध्ये होत आहे. अनेक हिट चित्रपटांसोबतच त्याच्या अनेक डान्स स्टेप्सही प्रसिद्ध आहेत. सध्या शाहिद त्याच्या ओटीटी पदार्पणामुळे चर्चेत आहे. अलीकडेच मेझॉन प्राईमवर 'फर्जी' नावाची सीरिज प्रदर्शित झाली आहे. शाहिद एक स्टारकिड आहे. त्याचे वडील पंकज कपूर आहेत. पण त्याचा चित्रपट प्रवास इतका सोपा नव्हता. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली. शाहिद 'ताल' आणि 'दिल तो पागल है' या चित्रपटांत बॅकग्राऊंड डान्सर होता. याशिवाय शाहिद बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी शिमकच्या डान्स ग्रुपचाही एक भाग होता. शाहिद ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा पुतण्या आहे. हे फार कमी जणांना माहीत असेल. शाहिदची सावत्र आई सुप्रिया पाठक ही रत्ना पाठक-शाह यांची बहीण आहे, जिचे लग्न नसीरुद्दीन शाह यांच्याशी झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news