पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पोर्न रॅकेटमध्ये चांगलाच अडकला आहे. त्याच्यामुळे पत्नी शिल्पा शेट्टी सुद्धा अडचणीत आली आहे.
राज कुंद्राची शिल्पा शेट्टी दुसरी पत्नी आहे. त्याने पोर्न रॅकेटमध्ये अटक होण्यापूर्वी पहिली पत्नी कविताविषयी एक दीर्घ मुलाखत दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी कविता (राज कुंद्राची पहिली पत्नी) राज कुंद्राच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे शिल्पा शेट्टीवर विविध आरोप केले. म्हणूनच राज कुंद्रने स्वत: समोर येऊन खुलासा केला होता. या दीर्घ मुलाखतीत राज कुंद्राने बरेच सनसनाटी खुलासे केले.
ईटाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत राज म्हणाला की, "या विषयावर अनेक वर्षांनी बोलताना दडपण दुर झाले आहे कारण मी सत्य बोलत आहे. कविता आता याबद्दल काय म्हणते याची मला पर्वा नाही. माझ्या आईने माझी पहिली पत्नी कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा रंगेहाथ पकडले होते. येथे २ कुटुंबे उद्ध्वस्त होत होती आणि त्यांनी त्याबद्दल विचार केलाही नाही.
घटस्फोटानंतर कविताशी कधीही बोललो नाही.
घटस्फोटानंतर पहिली पत्नी कविताबाबत बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, मी कविताशी कधी बोललो नाही, मला नको आहे. मी माझ्या मुलीला भेटण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण कविताच्या कुटूंबाने हे कधीही होऊ दिले नाही. मला माहित आहे की जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा माझी मुलगी माझ्याकडे येईल. मी फक्त ४० दिवस माझी मुलगी पाहिली आहे. त्यानंतर शिल्पाशी लग्न करून मी भारतात आलो. माझ्या मुलीला मी भेटायला नको अशी कविताची इच्छा होती आणि त्यावेळी कोर्टानेही कविताच्या बाजूने निकाल दिला.
राज पुढे म्हणाला की, 'जेव्हा मी शिल्पाला व्हायरल झालेले जुने लेख पाठविले, तेव्हा तिने मला याबद्दल बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती. हे लेख विशेषतः तिच्या वाढदिनी व्हायरल झाले आणि यामुळे मला धक्का बसला. कविताने माझा विश्वासघात केला, ठीक आहे, परंतु ज्या प्रकारे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्याबद्दल मी त्यांना कधीही क्षमा करू शकत नाही. शिल्पा माझ्या मुलाखतीमुळे नाराज आहे पण सत्य कोठेतरी तरी समोर येणारचं होतं.
हे ही वाचलं का?