पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, यशश्री, त्रिशूल, समृद्धी, मेघा, अक्षय आणि रोहित यांच्यामध्ये चर्चासत्र भरणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा, यशश्री आणि समृद्धी आपआपले मुद्दे मांडताना दिसणार आहेत. (बिग बॉस मराठी 4 ) अपूर्वाचे म्हणणे आहे, "आपल्याकडे चॉइसेस आहेत टीम बनवण्याचे तर मला असं वाटतं यशश्री, मी आणि मेघाताई यांना खेळण्याचे प्राधान्य दिले पाहिजे. कारण आम्हांला आमच्या प्रेक्षकांना. कारण आम्ही तिथे (नॉमिनेशनमध्ये) डिसर्व्हचं करत नाही. आम्ही तिघेही चर्चतलेच विषय होतो कायम. (बिग बॉस मराठी 4 )
समृद्धीचे म्हणणे आहे- कॅप्टन्सीचे काही असेल ना तर मी खेळणार, कारण मला खरंच खेळायचं आहे. त्यावर यशश्री म्हणाली, "आपणं आपलं पर्सनल लेव्हलला खेळूया, ग्रुपचा टास्क असेल तेव्हा ग्रुपबरोबर खेळूया. कारण, आपण धरून चालूया जर माझ्याकडे तुमच्या दोघींची (मेघा ताई आणि अपूर्वा) बॅग असेल तर मी तुम्हाला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार हे माझं खूप क्लिअर आहे आणि तुमचं देखील तसंच असायला हवं असं मला वाटतं."