पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना बऱ्याचदा आपणं कुठे चुकतं आहोत, आपणं रागाच्या भरात काय बोलून गेलो हे कळतं नाही. आणि त्यामुळे सदस्यांना व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतात. याचविषयी आज समृद्धी यशश्रीसोबत friend to friend चर्चा करताना दिसणार आहे. (बिग बॉस मराठी 4- day 15) समृद्धी यशश्रीला सांगताना दिसणार आहे. "एक गोष्ट मला सांगायची आहे. I really like your courage. खरंच appreciate करते मी. हे सगळे तुझ्याविरुध्द्व असले तरीदेखील. पण काय होणार, या गोष्टीमुळे तू खूप impulsive दिसतेस. पुढे जेव्हा तुला स्ट्रॉंग सपोर्ट लागेल ना तेव्हा लोकं दोन तीन वेळा विचार करतील. मला माहिती आहे तुला असं वाटतं की, कोणी तुझं ऐकत नाहीये वैगरे, पण मी तुला consider करते. पण त्याचवेळेला दुसरी बाजू इतकी स्ट्रॉंग होऊन जाते कि तुझ्या impulsivness मुळे…" रोहितचं पण म्हणणं पडलं "तू टार्गेट होते आहेस majorly" त्यावर यशश्री तिची बाजू मांडताना दिसणार आहे. "समृद्धी ज्यांना माझ्याविषयी विश्वास वाटायला पाहिजे त्यांना मी दाखवून दिले आहे." (बिग बॉस मराठी 4- day 15)
अजून ही चर्चा किती पुढे गेली? समृद्धीने दिलेला सल्ला यशश्रीला पटला का? पाहणे रंजक ठरेल.