प्रार्थना बेहेरे हिने लॉन्च केले ‘आपली यारी’ गाणे

आपली यारी
आपली यारी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रार्थना बेहेरे हिने फ्रेंडशीप डे निमित्त 'आपली यारी' गाणे लॉन्च केले. प्रार्थना बेहेरे आणि बॉलिव़ूड निर्माता निखिल नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. सलमान खानचा चित्रपट बॉडीगार्डमुळे प्रार्थना आणि निखिलची फ्रेंडशीप झाली.

अधिक वाचा – 

यानिमित्ताने प्रार्थनाने निखिल नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

अभिनेत्री बेहेरे म्हणाली, "नादखुळा या निखिलच्या म्युझिक लेबलवर आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली. याचा मला आनंद आहे.

अधिक वाचा – 

निखिलची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरील गाणे मी लाँच करावे. हा दुग्धशर्करा योग आहे."

निर्माता निखिल नमीत म्हणतात, 'आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि जगात लय भारी अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय."

अधिक वाचा- 

'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे.
पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे हे गाण्यासाठी एकत्र आले. शिवाय तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतीक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

प्रार्थना बेहेरे हिने फ्रेंडशीप डे निमित्त 'आपली यारी' गाणे लॉन्च केले.
प्रार्थना बेहेरे हिने फ्रेंडशीप डे निमित्त 'आपली यारी' गाणे लॉन्च केले.

अर्ध्या दिवसात १ मिलीयन व्ह्यूज

नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. या गाण्याला निव्वळ १२ तासांमध्येच १ मिलियन व्ह्यूज मिळाले.

'मराठी इंडस्ट्रीतला मिलेनियर म्युझिक डायरेक्टर' अशी ओळख असलेल्या प्रशांत नाकतीच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे.

प्रशांत नाकती गाण्याविषयी म्हमाले. – मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरील गाणी पाहिली आहेत. पण पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे.

मला पूर्ण विश्वास आहे- हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला आपल्या कॉलेजचे दिवस आणि आपले जवळचे मित्र-मैत्रीण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. मला अतिशय आनंद आहे. या गाण्यामुळे त्या १० जणांमध्येही एक घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.

पाहा व्हिडिओ – आपली यारी नवे फ्रेंडशीप गाणे 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news