CBSE Result 2021 : तर CBSE ने चेल्लम सरांचे मीम केले शेअर | पुढारी

CBSE Result 2021 : तर CBSE ने चेल्लम सरांचे मीम केले शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : CBSE Result 2021 चा बारावीचा निकाल लागण्यास विलंब झाला. CBSE Result 2021 बारावी निकालाबाबत  पालक, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाकडे प्रश्न उपस्थित करू लागले होते. यावर सीबीएसईने पालकांना उत्तर देत एक मीम शेअर केले. यामध्ये family man season 2 चा उल्लेख केला आहे.

फॅमिली मॅनमध्ये मुख्य भूमिका असलेला श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) आणि दुसरीकडे चेल्लम सर (उदय महेश) यांचे फोटो या मीममध्ये वापरण्यात आले आहेत. या मीममध्ये चेल्लम सरांना श्रीकांत तिवारी प्रश्न विचारत आहे. सीबीएसईचा निकाल कधी लागणार माझ्या मुलाचा निकाल येणार आहे.

यावर चेल्लम सर म्हणतात, श्रीकांत घाई करून नकोस लवकरच तुमच्या हाती सीबीएसईचा निकाल येणार आहे.

सीबीएसईने मुलांच्या आणि त्यांच्या पालकांची चिंता कमी करण्यासाठी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणारे असे मीम्स शेअर केले आहेत.

या मीम्सवर काही पालकांचा विश्वास बसत नव्हता, यामुळे पालक सीबीएसईच्या पेजवर जाऊन बघत होते.

अवघ्या काही वेळात सीबीएसईने टाकलेले मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सीबीएसई चा बारावीचा निकाल आज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) चा बारावीचा निकाल आज शुक्रवारी दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट http://cbseresults.nic.in अथवा cbse.gov.in यावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

सीबीएसई बारावी परिक्षेसाठी यंदा १४.५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मात्र, कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देखील देण्यात आले नव्हते. मुल्यांकन फॉम्युला आधारावर निकाल तयार करण्यात आला आहे.

सीबीएसई आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळांना ३१ जुलै २०२१ पर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार आज दुपारी सीबीएसईचा निकाल जाहीर केला जात आहे.

Back to top button