परिणीती चोप्रा चमकणार चमकिलामध्ये

परिणीती चोप्रा चमकणार चमकिलामध्ये
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तिच्यासाठी एक वाईट बातमीही आहे आणि ती म्हणजे तिला रणबीर कपूरचा चित्रपट सोडावा लागलेला आहे.

परिणीती चोप्रा ही रणबीरच्या एनिमल या चित्रपटात काम करणार होती. मात्र, चित्रपटासाठी डेटस् नसल्याने तिला हा चित्रपट सोडावा लागला. दरम्यान परिणीती आता प्रथमच इम्पियाज अलीसोबत चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव चमकिला असे आहे. खरा तर हा चित्रपट पंजाबी सिंह अमरसिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे.

सध्या परिणीतीकडे इम्तियाज यांच्या चमकिलासह सूरज बडजात्या यांचा उंचाई हा चित्रपट आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या चित्रपटात बिग बी अमिताभ आणि अनुपम खेर यांच्यासोबत ती काम करणार आहे. परिणीतीने 2011 मध्ये लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news