कोल्हापूर : मॅरेथॉन प्रॅक्टिस रन उद्या | पुढारी

कोल्हापूर : मॅरेथॉन प्रॅक्टिस रन उद्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राजर्षी शाहू निर्मित क्रीडा परंपरेला प्रोत्साहन – पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडावेत, लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येक कोल्हापूरकर फिट व्हावा या उद्देशाने वायू डाइनटेक अँप प्रेझेंटस् ‘केएससी रग्गेडियन कोल्हापूर रन’ पॉवर्ड बाय एस.जे.आर. टायर्स कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रग्गेडियन क्लब यांच्या वतीने दि. 24 एप्रिल रोजी पोलिस मैदानापासून ‘कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉन’ होणार आहे.

याच्या सरावासाठी रविवारी (दि. 27) सकाळी 6 वाजता, शिवाजी विद्यापीठ मैदानावर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खेळाडूंचा विशेष सराव घेण्यात येणार असून यात तज्ज्ञ खेळाडू व आयर्न मॅन यांचे मार्गदर्शन स्पर्धकांना मिळणार आहे.

मॅरेथॉनचे अंतर व मार्ग असा

5, 10, 21, 42 व 50 कि.मी. अशा पाच गटांत स्पर्धा होईल. 18 वर्षाच्या आतील व 18 ते 34, 35 ते 40, 41 ते 65 व पुढे 65 वर्षावरील सर्व महिला व पुरुष गट असणार आहेत. पोलिस ग्राऊंड – कावळा नाका – केएसबीपी चौक – एअरपोर्ट – अंबाबाई मंदिर – पुन्हा पोलिस ग्राऊंड या मार्गावरून मॅरेथॉन होणार आहे.

स्पर्धकांना मिळणार्‍या सुविधा

स्पर्धेत नाव नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट, मेडल, नाष्टा, सर्टिफिकेट, गुडी बँक, रेसचे फोटो, टाईम चिप आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. शिवाय झुंबा, नाशिक बेल, रॉक बँड, पोलिस बँड, मर्दानी खेळ, ढोल-ताशा, पारंपरिक लेझीम, वाद्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

स्पर्धेचे प्रायोजक असे

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक हे वायू डाइनटेक अँप व एस.जे.आर. टायर्स हे आहेत तर दै. ‘पुढारी’ हे स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत आणि सहप्रायोजक हे ब्लोमिंग बडस् पब्लिक स्कूल, एचपी हॉस्पिटॅलिटी, डीकॅथलॉन, रेमंड लक्झरी कॉटन, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर टुरिझम, जे. के. ग्रुप, आयनॉक्स, धनश्री पब्लिसिटी आदी आहेत तर टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आणि बी न्यूज मीडिया पार्टनर आहेत.

नावनोंदणीसाठी संपर्क

मॅरेथॉनमध्ये नावनोंदणीसाठी रग्गेड कब किडस् फिटनेस अ‍ॅकॅडमी, तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे सासने ग्राऊंड येथे दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com
या संकेतस्थळावर किंवा 7776981548 / 7722067477 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

‘रांगडेपणा’ हे कोल्हापूरकरांच्या जगण्याचे वैशिष्ट्य आहे. मुळातच साहसी वृत्ती असलेल्या कोल्हापूरकरांना स्वतःला चॅलेंजेस देऊन लिमिटस् पुश करणं आवडतं. वायू डाइनटेक अँपचे हेच स्पिरिट आहे. म्हणूनच कोल्हापूरकरांना सहकार्य करायला यावर्षीच्या कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉनचे वायू डाइनटेक अँप मुख्य प्रायोजक आहे.
– राजेश करंदीकर, वायू डाइनटेक अँप

Back to top button