न्यूयॉर्क महोत्सवात जितेंद्र जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

न्यूयॉर्क महोत्सवात जितेंद्र जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

पुढारी ऑनलाईन : कान्स चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशी यांच्या 'गोदावरी' चित्रपटाची निवड झाल्यानंतर आता या चित्रपटाबाबत आणखी एक सन्मानाची खबर आली आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशी यांची 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता 'गोदावरी' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित, निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटाला जगभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ सतरा दिवसांमध्येच चित्रीत करण्यात आला आहे. आयुष्य आणि मृत्यू यांच्यामधील गुंता सोडवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या कथेत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news