मुंबई : विभक्त पत्नीच्या ताब्यात असलेल्या दोन मुलांच्या शोधात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या मुलांचा थांगपत्ता लागत नाही. त्यांचा ठावठिकाणा सांगण्याचे विभक्त पत्नीला आदेश द्या अशी विनंती त्याने
न्यायालयाला केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी ३ मार्चला निश्चित केली आहे.