सध्या ख्रिसमसनंतर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत आहेत. अभिनेता अक्षय कुमार गोव्यात कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात अक्षय नाचताना गाताना आणि गिटार वाजवताना • दिसत आहे. या व्हिडीओवर हटके कमेंट करत ट्विंकलने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की मी त्यावेळी वेगळ्या रूममध्ये होते आणि मी अक्षयला गाताना पाहिले नाही, तो किती बेसुरा गात आहे. अक्षयच्या या व्हिडीओवर चांगल्या प्रतिक्रिया करत असताना पत्नी ट्विंकल खन्नाने व्हिडीओवर कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. व्हिडीओत अक्षयने काळ्या रंगाचं हाफ जॅकेट आणि जीन्स घातली आहे.