जेनेलिया डिसूजाचा ‘देसी लूक’!

जेनेलिया डिसूजाचा ‘देसी लूक’!

पुढारी ऑनलाईन : जेनेलिया डिसूजा आता पुन्हा एकदा कॅमेर्‍यासमोर आलेली आहे. ती सोशल मीडियातही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे बरेच दिवस चित्रपट केलेले नसले तरी ती चाहत्यांच्या संपर्कात आहेच. तिचे आणि नवरोबा रितेश देशमुखचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत.

आताही तिने इन्स्टाग्रामवर आपले काही नवे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिचा अस्सल भारतीय लूक दिसून येतो. या फोटोशूटवेळी तिने शरारा परिधान केला होता. त्याला साजेसा मेकअप आणि ज्वेलरीमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटस्चा वर्षाव होत आहे. सलमान खानची बहीण अर्पिता हिने दिलेल्या ईदच्या पार्टीत जेनेलियाने हा पोशाख परिधान केला होता.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news