पुढारी ऑनलाईन
कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेता जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. जितेंद्रचा निर्माता म्हणून 'गोदावरी' हा पहिलाच चित्रपट आहे. या पहिल्याच चित्रपटाची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाल्याने जितेंद्रचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'गोदावरी'चे पोस्टर शेअर करीत ही आनंदाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. या महोत्सवासाठी भारतातून पाठवण्यात येणार्या सहा चित्रपटांमध्ये 'गोदावरी'चा समावेश आहे. चित्रपटात जितेंद्रसह नीना कुळकर्णी, संजय मोने, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव आदींच्या भूमिका आहेत.