‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न’वर अमेझॉन प्राईम व्हिडिओची मोहोर

मिर्झापूर सीझन २
मिर्झापूर सीझन २
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' २०२१ वर अमेझॉन प्राईम व्हिडिओने मोहोर उमटवली आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओजने 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' (आईएफएफएम) २०२१ मध्ये यश मिळवले आहे.

यामध्ये अमेझॉन ओरिजिनल 'द फॅमिली मॅन', 'मिर्जापूर सीजन-२', 'शेरनी' आणि 'सोरारई पोटरू' आदींचा समावेश आहे.

मेलबर्न येथील हा हा फेस्टिवल ऑस्ट्रेलियातील एक मोठा उत्सव आहे. तो भारतातील सर्वोत्तम मनोरंजनाला एका छताखाली आणतो.

या वर्षीच्या आईएफएफएम २०२१ मध्ये, 'बेस्ट वेब सीरिज' श्रेणीत लोकप्रिय वेब सीरीज अव्वल आहे.

भारताचा बहुचर्चित क्राईम ड्रामा मिर्झापूर सीझन २ विजयी ठरला आहे.

हेही वाचलं का? 

सूरीया सिवकुमार, विद्या बालन यांनी 'सोरारई पोट्रु', 'शेरनी'मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार पटकावला आहे.

द फॅमिली मॅनमधील 'श्रीकांत तिवारी' मनोज वाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) चा पुरस्कार मिळाला आहे.

समंथा अक्किनेनीला, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

मल्याळम कौटुंबिक ड्रामा, द ग्रेट किचनने 'इक्वालीटी ऑफ सिनेमा' (फीचर) श्रेणीमध्ये ओळख मिळवली आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडिओने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी:

• अमेझॉन ओरिजिनल सीरीज, मिर्जापुर सीजन 2 'सर्वश्रेष्ठ वेब सीरीज'

• 'सर्वश्रेष्ठ प्रदर्शन' (पुरुष): सूरीया सिवकुमार (Suriya Sivakumar) अमेझॉन ओरिजिनल मूवी 'सोरारई पोट्रु' (Soorarai Pottru) साठी

• 'सर्वश्रेष्ठ फिल्म': अमेझॉन ओरिजिनल मूवी 'सोरारई पोट्रु' (Soorarai Pottru)

• 'सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस' (महिला): विद्या बालन (Vidya Balan) ने अमेझॉन ओरिजिनल मूवी, शेरनी मधील भूमिकेसाठी.

• 'वेब सीरीज सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस' (पुरुष): मनोज बाजपेयीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज, 'द फैमिली मैन'मध्ये श्रीकांत तिवारीच्या आपल्या शानदार प्रदर्शनासाठी

• 'वेब श्रृंखला सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस' (महिला): सामंथा अक्किनेनीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज, द फैमिली मैन' राजी च्या व्यक्तिरेखेतील आपल्या भूमिकेसाठी

• 'इक्वालीटी ऑफ सिनेमा' (फीचर): अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील मल्याळम फॅमिली ड्रामा, 'द ग्रेट किचन'साठी.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news