आर. माधवनने साकारला ‘इस्रो’च्या वैज्ञानिकाचा बायोपिक

आर. माधवनने साकारला ‘इस्रो’च्या वैज्ञानिकाचा बायोपिक

पुढारी ऑनलाईन

अभिनेता आर. माधवन याचा चित्रपट 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'ची गतवर्षी चांगलीच हाईप निर्माण झाली होती. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. आता माधवनने या चित्रपटाची नवी रीलिज डेट जाहीर केली असून 1 एप्रिल रोजी हा चित्रपट जगभरात रीलिज होत आहे.

हा चित्रपट माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. 'इस्रो'चे सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि एअरोस्पेस इंजिनिअर नांबी नारायण यांचा हा बायोपिक आहे. एका गप्‍तचर घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालला. त्यामुळे अनेक वर्षे त्यांना सामाजिक अवहेलनेला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या याच जीवनसंघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात किंग खान म्हणजे शाहरूख खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या यांचाही कॅमियो असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news