

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याची धाकटी मुलगी रिया कपूर बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत विवाह बंधनात अडकली. या विवाह सोहळ्यात रियाची बहीण सोनम कपूर आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली होती. तर सध्या रियाच्या रिसेप्शन पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.
अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूरचा विवाह १४ ऑगस्टला मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. सोनमने या खास प्रसंगी पेस्टल ग्रीन रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. यानंतर सोनमचे फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला.
हे फोटो व्हायरल होताच सोनम कपूरच्या प्रेंग्नशीबद्दल प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. सध्या अनिल कपूर यांनी विवाह सोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. रिसेप्शन पार्टीत देखील काही मोजकेच नातेवाईकांनी सहभाग नोंदविला आहे. यात निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने हजेरी लावली आहे.
या पार्टी दरम्यानचा फराह खानने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अनिल कपूर आणि मुलगी रिया कपूर डान्स करताना दिसत आहेत. दोघेजण सोनम कपूरच्या 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओत अनिल कपूर यांनी पिवळ्या रंगाचा कूर्ता तर रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओसोबत 'या माणसावर माझे प्रेम आहे. मी पाहिलेला वडील आणि मुलीचा सगळ्यात चांगला डान्स,' असे कॅप्शन लिहिले आहे.
अनिल कपूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांच्या जुहू येथील बंगल्यात रियाचे १४ ऑगस्ट रोजी लग्न पार पडले होते. रिया आणि करण हे दोघे गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
हेही वाचलंत का?