बलात्कार पीडितेची पोस्ट डिलीट करा; राहुल गांधींना फेसबुकची नोटीस

Analysis by Dnyaneshwar bijale on Rahul Gandhi and sonia gandhi Ed enquiry
Analysis by Dnyaneshwar bijale on Rahul Gandhi and sonia gandhi Ed enquiry
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: बलात्कार पीडित बालिकेची ओळख उघड करणारी पोस्ट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना फेसबुकची नोटीस आली आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) कडून फेसबुकला समन्स मिळाल्यानंतर गांधी यांना इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट डिलीट करण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने १० ऑगस्ट, २०२१ रोजी नोटीस पाठविली होती. यात इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अपलोड केलेली पोस्ट बेकायदेशीर आहे.

एनसीपीसीआरच्या सूचनेनुसार, ही पोस्ट त्वरित काढून टाकण्याची विनंती केली होती.

एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते.

तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. फेसबुकने कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले.

त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले.

जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना पाठवलेल्या मेलची प्रत एनसीपीसीआरला पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली.

ट्विटरने केली होती कारवाई

काही दिवसांपूर्वी ट्विटरने राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी त्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. आता राहुल गांधींना फेसबुकची नोटीस आली आहे.

तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांची अकाऊंट डिलिट केली होती. मात्र, त्यानंतर गदारोळ झाला आणि अकाऊंट पूर्ववत केले होते.

हेही वाचा:

पहा व्हिडिओ: एक स्त्री आणि दोन पुरुष एकत्र राहू शकतात का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news