अग्गबाई सासूबाई फेम सासू -सुनेचा फूड मूड

अग्गबाई सासूबाई
अग्गबाई सासूबाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: छोट्या पडद्यावरील 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेत सासू-सुनेची भूमिका आसावरी राजे आणि शुभ्रा या पात्रांनी साकराली होती. आसावरी राजे म्हणजे, मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि शुभ्रा म्हणजे, मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. या दोघींची सासू-सूनेची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. पडद्यावरच्या भूमिकेनंतर खऱ्या आयुष्यातही दोघींना डिनर डेटवर एकत्रित पाहायला मिळाले आहे.

नुकतेच तेजश्री प्रधानने तिच्या इंन्स्टाग्रामवर तिचा आणि अभिनेत्री निवेदिता सराफसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील सासू-सून पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात पाहायला मिळाल्या. यावेळी तेजश्री आणि निवेदिता दोघींनी निळ्या रंगाच्या कपड्यात दिसल्या. तर तेजश्रीच्या पुढे डिनर टेबलवर काही खाण्याचे पदार्थ दिसत आहेत. यावरून तेजश्री आणि निवेदिता दोघीजणी चांगल्या मैत्रणी असून निवेदिताने तिला खाण्याचे आमंत्रण दिल्याचे दिसत आहे. हा फोटो दोघींनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी दोघीही आनंदित दिसत होत्या.

निवेदिताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'माझी आवडती मुलगी तेजूसोबत डिनर डेट. ब्रोकोली सूप, स्टिर-फ्राय व्हेजीज आणि होम बेक्ड राई सीरियल ब्रेड आणि खूप साऱ्या गप्पा' असे म्हटले आहे. तर हा फोटो शेअर करताना तेजश्रीने त्यांच्या जेवणाचे तोंड भरून कौतुक केले आहे. यातील खास म्हणजे, दोघीजणी विना मेकअप असून एकमेंकाच्या अगदी जवळ बसल्या आहेत.

दोघींचा सोशल मीडियावर फोटो शेअर होताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. नेटकऱ्यांनी या फोटोवर कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. Charming gorgeous angel looks, Very nice picture, अप्रतिम सौंदर्य!, So Beautiful.❤️, मस्तच, Wow Fashion Superb, Wow Fashion Superb, खूप सुंदर..यासारख्या अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे इमोजी शेअर केले आहेत.

याच दरम्यान एका युजर्सने अग्गबाई सासूबाई ही मालिका संपून खूपच दिवस झाले असून आता एकत्रित आलाय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून दोघींना पुन्हा एकत्रित पाहण्यास चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news