हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री दीपिका पुदुकोन (Deepika Padukone) हिला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अचानक ह्रदयाचे ठोके वाढल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे तिला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपिका पदुकोन सध्या हैदराबाद येथे एका चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. चित्रपटाच्या सेटवर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेत्री दीपिका (Deepika Padukone) सध्या हैदराबाद येथे तिचा आगामी चित्रपट 'प्रोजक्ट के' चे शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात बीग बी अमिताभ बच्चन यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सेटवर दीपिकाला अस्वस्थ वाटू लागले तसेच तिला ह्रदयाचे ठोक वाढल्याचा त्रास जाणवू लागला. यावेळी सेटवरील सहकार्यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथील कामिनेनी रुग्णालयात दाखल केले.
यावेळी दीपिकाची (Deepika Padukone) डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केली. तपासात तिच्या ह्रदयाचे ठोके वाढल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयातील उपचारानंतर तिच्या ह्रदयाचे ठोके आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. उपचारानंतर दीपिका तिच्या हॉटेलमध्ये परतली असून सध्या ती विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एक डॉक्टरांची टीम तिच्यावर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.
'प्रोजेक्ट के' या चित्रपटात दीपिका पदुकोन प्रथमच अभिनेता प्रभास सोबत काम करत आहे. तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन असल्याने या चित्रपटाची चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन हे करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान ते म्हणाले होते, ' मी या चित्रपटात दीपिका पदुकोन जे पात्र साकारत आहे त्याबाबत मी खूप उत्साही आहे. आज पर्यंत मुख्य प्रवाहातील सिनेमामध्ये कोणीही अशी भूमिका साकरली नाही अशी भूमिका दीपिका प्रथमच साकारत आहे. एक प्रकारे सर्वांना हा सुखद धक्काच असेल. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री दीपिका हे या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण आहे. हा चित्रपट सर्वांसाठीच चांगला अनुभव असणार आहे. अशी प्रतिक्रीया नाग अश्विन यांनी दिली होती.