Zubeen Garg Death Case | '३५०० पानांचे चार्जशीट...' जुबिन गर्ग प्रकरणात SIT ची मोठी कारवाई, ७ जण अटकेत

Zubeen Garg Death Case | आसाम पोलिसांच्या एसआयटीकडून ३५०० पानांचे चार्जशीट दाख‍ल, ७ अटेकत
image of Zubeen Garg
Zubeen Garg Death Case latest update instagram
Published on
Updated on
Summary

जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात आसाम पोलिसांच्या एसआयटीने ३५०० पानांचे मोठे चार्जशीट दाखल करून तपासाला नवे वळण दिले आहे. सात जणांना अटक झाल्याने प्रकरणातील गंभीरता वाढली असून या दिग्गज गायकाच्या मृत्यूमागील कारणांबाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत.

Zubeen Garg Death Case SIT 3500 Chargesheet court

असममधील सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) कारवाई करत ३५०० पानांची चार्जशीट गुवाहाटी येथील कोर्टात दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला नवे वळण लागले आहे. कारण, आतापर्यंत या प्रकरणी सात जमांना अटक करण्यात आलीय तर ३०० शब्दांची चार्जशीट बनवण्यात आलीय.

ही चार्जशीट आतापर्यंतच्या तपासातील सर्वात मोठा दस्तऐवज आहे, ज्यात ३०० हून अधिक लोकांचे निवेदन, फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल पुरावे आणि घटनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती आहे. चार्जशीटमध्ये हत्‍या, कट आदी कलमे जोडण्यात आली आहेत. SIT ने ३ महिन्यांनंतर चार्जशीट दाख‍ल केलीय. सोबतच CID च्या स्पेशल DG मुन्ना प्रसाद गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली SIT ने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे गुवाहाटीच्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये जमा केले आहेत.

image of Zubeen Garg
Flash Back 2025 | 'या' स्टार्सनी निवडला ‘आवडता हमसफर’, एकापेक्षा एक ब्रायडल लूक पाहून व्हाल घायाळ!

जुबीन गर्ग यांचा मृत्यू १९ सप्टेंबर, २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्‍व‍िमिंग वेळी झाली होती. ते नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी कल्चरल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सिंगापूरला गेले होते. फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी ते १९ सप्टेंबर रोजी ते एका यॉट ट्रिपवर गेले होते. असं म्हटलं जात आहे की, आसाम असोसिएशन सिंगापूरचे सदस्‍य त्यांना यॉटवर घेऊन गेले होते. तिथे ते बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

SIT ने ३०० हून अध‍िक लोकांची केली चौकशी

तपासणी दरम्यान, एसआयटीने त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, बँडचे साथीदार, फॅन्स, सिंगापूरमध्ये राहणारे असमिया NRI सहित ३०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली.

image of Zubeen Garg
Flash Back 2025 | कधी गुपचूप, कधी ग्लॅमरसली पब्लिक! 'या' सेलेब्रिटींच्या नात्यांत पडली फूट

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आधी जुबीन यांचा मृत्यू 'हत्या' असल्याचे सांगितले होते. सरमा यांनी मागील महिन्यात नोव्हेंबर महिनयात म्हटलं होतं. 'हे पहिल्या दिवसापासून हत्या प्रकरण होते. संशयित आरोपी श्यामकानु महंत, सिद्धार्थ शर्मा, अमृतप्रभा महंत, शेखर ज्योति गोस्वामी सध्या तुरुंगात बंद आहेत.' जुबीन यांचा चुलत भाऊ, आसाम पोलिस सर्विस ऑफिसर संदीपान गर्ग, अमृतप्रभा महंत यांचे दोन खासगी सिक्युरिटी ऑफिसर (PSO) परेश बैश्य आणि नंदेश्वर बोरा यांनाही अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news