

2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी रिलेशनशिप ब्रेकअप्स आणि वादांनी गाजलं. काही स्टार कपल्सने शांततेत आपापले मार्ग वेगळे केले. तर काहींनी सोशल मीडियावर किंवा इंटरव्ह्यूमधून नातं संपल्याचं जाहीर केलं. चाहत्यांना धक्का देणाऱ्या अनेक स्टार्सच्या ब्रेकअप्सची चर्चा वर्षभर चालली.
Year Ender 2025 bollywood couple seperations
2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी केवळ हिट चित्रपट, गाण्यांच्या ट्रेंडपुरतं मर्यादित नव्हतं तर या वर्षी अनेक लोकप्रिय बॉलिवूड कपल्सच्या नात्यांत दुरावा आला आहे. कुणी नातं सांभाळू न शकल्यानं शांतपणे वेगळं झालं, तर कुणी थेट सोशल मीडियावर नातं संपल्याचं जाहीर केलं. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. अगदी १०-१५ वर्षांच्या सुखी संसारानंतरही प्रेमकहाणी टिकू शकली नाही.
काही कपल्स त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीच बोलायचे नाही. केवळ त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होत राहिली. सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो डिलीट करणे, एकत्र न दिसणे किंवा अनेकदा इमोशनल पोस्टनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचा अंदाज चाहते बांधायचे. अशा कपल्समध्ये काही लोकप्रिय स्टार्सचा देखील समावेश होता.
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा
वर्षाच्या सुरुवातीलाच चहल आणि धनश्री यांच्या काडीमोडच्या बातम्या समोर आल्या. काही कालावधीनंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर धनश्रीने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तर चहलचे नाव अभिनेत्री आरजे महावश सोबत जोडले गेले.
सेलिना जेटली आणि पीटर हाग
अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिने त्याच्यावर मानसिक छळ आणि मालमत्ता हडपल्याचा आरोप केलाय.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना
क्रिकेट स्टार स्मृती मानधनाला संगीतकार पलाश मुच्छलने डी. वाय. पाटील नवी मुंबई स्टेडियमवर प्रपोज केलं होतं. पण तिने लग्नाच्या काही तास आधी त्याच्या सोबत ब्रेकअप केले. काही अवधीनंतर त्यांनी जाहीर केलं की, त्यांचे लग्न होणार नाही.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा
बॉलिवूडमधील या स्टायलिश कपलची नेहमीच चर्चा व्हायची. पण अचानक वृत्त येऊन धडकलं की, दोघांचा ब्रेकअप झाला. मीडिया रिपोर्ट्समध्ये वैयक्तिक मतभेदांमुळे ते वेगळे होत असल्याचे सांगण्यात आले. पण दोन्ही कलाकारांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. यानंतर विजय वर्माचे नाव दंगल गर्ल फातिमा सना शेख सोबत जोडले गेले. हे दोघे Gustaakh Ishq या चित्रपटात दिसले.
शुभांगी अत्रे आणि पियुष पुरी
"भाभी जी घर पर हैं" फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने फेब्रुवारी २०२५ मध्ये पियुष पुरीशी घटस्फोट घेतला. काही महिन्यांनंतर पियुष पुरी यांचे निधन झाले.
संजीव सेठ आणि लता सभरवाल
टीव्ही मालिकेतील लोकप्रिय कपल आणि "ये रिश्ता क्या कहलाता है" मधील लोकप्रिय जोी संजीव आणि लता यांनी जून २०२५ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. सोशल मीडियावर त्यांनी आपण वेगळे होत असल्याचे जाहिर केले होते.
मीरा वासुदेवन आणि विपिन पुथियाकम
दक्षिण भारतीय अभिनेत्री मीरा वासुदेवन यांच्या घटस्फोटाची सर्वाधिक चर्चा साऊछ चित्रपट इंडस्ट्रीत झाली. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचा तिसरा पती विपिन पुथियाकमपासून विभक्त झाल्याची तिने पुष्टी केली होती.
जी.व्ही. प्रकाश कुमार आणि गायिका सैंधवी यांनी लग्नाच्या १२ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये त्यांनी चेन्नई कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.