

Zubeen Garg Death Case latest update
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूर येथे गायक जुबीन गर्ग यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली होती. आता इतक्या महिन्यांनंतर मोठी अपडेट समोर आलीय.
गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूमध्ये कुठलेही षडयंत्र नसल्याचे सांगत सिंगापूरमध्ये एका बेटाजवळ त्यांचा अपघाती बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिंगापूर पोलिस कोस्ट गार्डच्या निष्कर्षाला एका अधिकाऱ्याने बुधवारी समर्थन दिले आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका बेटाजवळ झालेला जुबीन यांचा मृत्यू अपघात असल्याचा निर्णय त्यांनी दिला.
पत्नीने उपस्थित केला प्रश्न
माडिया रिपोर्टनुसार, जुबीन गर्ग यांची पत्नी सैकिया गर्ग यांनी सवाल उपस्थित केला होता की, जुबीन गर्ग यांच्या मृत्यूमागे कट रचला गेलाय. पण तापासाअंती अधिकारी एडम नखोदा म्हणाले, पोलिस कोस्ट गार्डने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. पोलिस कोस्ट गॉर्डना तपासात कुठलीही चुकीची गोष्ट आढळली नाही.
बुडाल्याने झाला मृत्यू
नखोदा यांना आढळले की, गर्ग यांचा मृत्यू केवळ पाण्यात बुडाल्यानेच झाला होता. कुणी त्यांना जबरदस्ती, दबाव आणून वा धक्का दिला नव्हता. एका वृत्तवाहिनीने नखोदा यांच्या हवाल्याने सांगितले की, त्याला वाचवणाऱ्या जलतरणपटूंनी जाणीवपूर्वक त्यांचा चेहरा पाण्याखाली ठेवल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.
जुबीन यांनी जॅकेट घालण्यास दिला होता नकार
रिपोर्टनुसार, नाखोडा यांनी सांगितले की, गर्ग मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम झाला. पहिल्यांदा पोहताना जुबीन यांनी लाईफ जॅकेट काढले होते. दुसऱ्यांदा पोहताना कॅप्टन आणि इतर प्रवाशांनी त्यांना जॅकेट घालण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला होता.