

Zubeen Garg Death Case cousin arrested
नवी दिल्ली - गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या प्रसिद्ध गायिका जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिस सेवा (एपीएस) अधिकारी संदीपन गर्ग यांना आसाम पोलिस सेवा (सीआयडी) च्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले आहे. दिवंगत कलाकाराचे चुलत भाऊ संदीपन हे कामरूप जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम करतात. आता संदीपन गर्ग यांचे जुबीन यांच्या मृत्यूशी काय संबंध आहे, याचा तपास केला जात आहे.
याआधी मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हल ऑर्गनायझरला अटक करण्यात आलीय. आता चुलत भावाला देखील अटक करण्यात आलीय.
पोलिसांच्या माहितीनुसार, संदीपन जुबीन सोबत सिंगापूरमध्ये यॉट पार्टीमध्ये सहभागी होते, जिथे जुबीन देखील उपस्थित होते. जुबीनची पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांनी जुबीन यांचा मृत्यू रहस्यमय असल्याचे म्हटले आहे. आता एसआयटी/सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
संदीपन यांच्या चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जुबीन यांच्यासोबत ते सिंगापूरला गेले होते आणि १९ सप्टेंबर रोजी जुबीनच्या स्कूबा डायव्हिंगवेळी ते तिथे उपस्थित होते. या अटकेमुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे.
इतरांमध्ये ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंता, गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी आणि कलाकार अमृतप्रव महंता यांचा समावेश आहे - हे सर्वजण सीआयडी कोठडीत आहेत. यापैकी, शेखर ज्योति गोस्वामीने आरोप केलाय की, सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानु महंतने जुबीनला विष दिलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, संदीपन गर्ग यांची चौकशी आहे सीआयडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी जुबीन यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली होती.
जुबीन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूर येथे स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला होता. २० सप्टेंबरला तिथे नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी ते गेले होते. परंतु, त्यांची पत्नी गरिमा यांचे म्हणणे आहे की, जुबीन यांचा मृत्यू हार्ट ॲटॅकने झाल आहे. गरिमा यांनी सांगितले होते की, झटक्यासाठी औषधे घेत होते आणि ही गोष्ट त्यांच्या मॅनेजरला देखील माहिती होती.