

Ek Deewane Ki Deewaniyat Trailer out now
मुंबई - बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा रोमान्स आणि थरारक कथेने परिपूर्ण चित्रपट येतोय. ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्यात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची इमोशनल केमिस्ट्री पाहायला मिळते. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ निर्माण केली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका रहस्यमय आणि गूढ प्रेमकथेनं होते. प्रेम, वेडेपणा, आसक्ती आणि सूड यांची गुंफण असलेली ही कथा पाहणाऱ्याला थक्क करते. हर्षवर्धन राणे एका वेड्या प्रेमात अडकलेला, तीव्र भावनांनी भारलेला प्रियकर साकारत आहे. सनम तेरी कसम फेम अभिनेता हर्षवर्धन राणे आपला आगामी चित्रपट 'एक दीवाने की दीवानियत'मुळे चर्चेत आहे. तो पुन्हा एकदा लव्ह स्टोरीमधून प्रेक्षकांसमोर येतोय, ज्यामध्ये प्रेम आणि द्वेष दोन्ही दिसेल. त्यांचा चित्रपट ‘एक दीवाने की दीवानियत’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाने ट्रेलरमध्ये अशी प्रेम कहाणी दाखवलीय, जे पाहून फॅन्स उत्सुक आहेत.
हर्षवर्धन राणेने आपल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. कॅप्शन देखील लिहिलीय - 'इतिहास का मैं पहला रावण हूं जो खुद सीता को घर छोड़ कर आएगा. #EkDeewaneKiDEEWANIYAT ट्रेलर अभी जारी...'
या दिवाळीत चित्रपटगृहामध्ये २१ ऑक्टोबर, २०२५ रोजी ट्रेलरच्या आधी चित्रपटाचा टीझरआणि गाणी खूप पसंतीस उतरले आहे. टायटल ट्रॅकसह एकूण ३ गाणे आतापर्यंत रिलीज झाले आहेत. तिन्हीही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून चित्रपटाची क्रेझ आहे.
हर्षवर्धन राणे यापूर्वी सनम तेरी कसम, तारा वर्सेस बिलाल यांसारख्या चित्रपटांतून चर्चेत आला होतो. तर सोनम बाजवा ही पंजाबी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. या दोघांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.
मिलाप जावेरी दिग्दर्शित या चित्रपटाचा सामना थामाशी होणार आहे. तामा चित्रपटात आयुष्मान खुराना -रश्मिका मंदाना यांच्याशी होईल. ‘थामा’ मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिवर्सचा भाग आहे.