'झोंबिवली' त बीजचा कहर रंगणार आहे. अमेय, ललित, वैदेही कल्ला करायला 'झोंबिवली' ( Zombivli Film) चित्रपटातून येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सज्ज होणार आहेत. सध्या या चित्रपटाची रिलीज डेटसह एक पोस्टर शेअर झाले आहे.
सारेगम प्रस्तुत यूडली फिल्म्स (Yoodlee Films) निर्मित असलेल्या 'झोंबिवली' चित्रपट ( Zombivli Film) कधी रिलीज होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. याच दरम्यान दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी 'झोंबिवली' चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा इंस्टाग्राम लाईव्हवरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी आपल्या अनोख्या अंदाजात रिलीज डेटची घोषणा करत पोस्टर लाँच केले आहे.
या पोस्टरवर ४ फेब्रुवारी २०२२ ला 'झोंबिवली' असे लिहिले आहे. यावरून हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ ला येत असल्याचे समजते. 'झोंबिवली' स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?