कोल्हापूर : उदगाव परिसरात तीन गव्यांचा धुमाकूळ | पुढारी

कोल्हापूर : उदगाव परिसरात तीन गव्यांचा धुमाकूळ

उदगाव; पुढारी वृत्तसेवा

कोथळी, उमळवाड परिसरात रविवारी (दि.१४) तर उदगाव व रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी (दि.१५) रोजी शेतात तीन गव्यांनी ( गवा ) धुमाकूळ घातला आहे. सोमवारी सकाळी उदगाव येथे अमोल पुजारी व पाणी पुरवठा संस्थेचे पाटकरी यांनाही गवे दिसून आली आहेत. त्यामुळे कोथळी, उदगांव परिसरात शेतकर्‍यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

आजपर्यंत उदगांव, उमळवाड, कोथळी परिसरात एकही गवा आढळून आला नव्हता. गत वर्षी दानोळी येथे दोन गवे आढळून आले होते. अशातच रविवारी कोथळी परिसरात गव्यांनी ऊस व भाजीपाला शेतीत चांगलाच धुडगूस घातला. त्यानंतर गव्यांनी उमळवाड परिसरात उच्छाद मांडला.

सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावरील रेल्वे भरावावरून सोमवारी सकाळी हे गवे उदगाव गावाच्या दिशेने आले आहेत. उदगांव येथे उमळवाड मार्गावर असलेल्या शितल चौगुले यांच्या ऊसाच्या शेतात या गव्यांनी चांगला धुडगूस घातला. नवीन लागण केलेल्या ऊस शेतात गव्यांनी आसरा घेतला असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास व्यायामाला गेलेल्या अमोल पुजारी यांना दोन गवे रेल्वे भराव पास करून आल्याचे दिसले. त्यामुळे उदगांव, उमळवाड, कोथळी, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन या परिसरातील शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : पंचगंगा नदी गिळतेय काठावरची शेती : काठावरच्या शेतकऱ्यांवर संकट

Back to top button