समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवा नेता’ चित्रपटाचा पोस्टर लॉन्च

‘युवा नेता’ चित्रपट लवकरच! लक्षवेधी पोस्टर लॉन्च
YuvaNeta Movie poster launched
युवा नेता नवा आशय घेऊन चित्रपट येत आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारणात फक्त रस असून चालत नाही, तर समाजभान असणं गरजेचं असतं. समाजासाठी उभा राहिलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या भोवती फिरणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा सोशल मीडियावर पोस्टर लॉन्च झाला आहे. पोस्टर सोशल मिडियावर तरूणांना आकर्षित करत असून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

YuvaNeta Movie poster launched
केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर
YuvaNeta Movie poster launched
'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी
Summary

‘सभेत सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता की युवानेता?’ असा प्रश्न करून पोस्टरने चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढवली आहे.

प्रकाश फिल्म्स प्रस्तुत ‘युवानेता’ चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. राजू राठोड आणि जगदीश कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

YuvaNeta Movie poster launched
केस कापल्यानंतर हिना खानचा नवा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'स्ट्रॉन्ग गर्ल'

पोस्टरमध्ये लाखोंच्या संख्येत असणारा समाज रस्त्यावर उतरला आहे. हातात झेंडे घेऊन जणू झोपलेल्या प्रस्थापितांना जागं करण्यासाठी मोर्चा निघालेला आहे. तळागाळातून आलेला एक तरुण हात उंचावून संपूर्ण समाजाचं नेतृत्व करताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news