'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

'तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता
subodh bhave-shivani sonar
Tu Bhetashi Navyane Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे.

पहिल्यांदा एआयवर आधारित मालिकेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले. सुबोध भावे यांच्यासोबाबत काम करण्याचा आनंद आणि दडपण दोन्ही असल्याचे शिवानी सोनार हिने सांगितले.

पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.

subodh bhave-shivani sonar
‘तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक

सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन

या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. चित्रपट व मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची, हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. त्याची प्रत्येक मालिका खास आहे. अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे.

subodh bhave-shivani sonar
शिवानी सोनार 'गौरी'च्या भूमिकेत, तू भेटशी नव्याने आगामी मालिका

सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत

'तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहे. या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे. शिवानी सोनार गौरी या भूमिकेत दिसणार आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत.

subodh bhave-shivani sonar
Bigg Boss OTT 3 मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर?

‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news