

Supreme Court Refuses Entertain Kangana Ranaut's Plea
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर रिट्विट केल्यानंंतर आता अभिनेत्री, खासदार कंगना रनौत यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी म्हटले की, कंगना यांची पोस्ट "कोणतीही साधारण रिट्विट नव्हते" आणि मुळच्या ट्विटमध्ये "मसाला" घालण्यात आला हता. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील ट्विटवरून कंगना रणौत यांची तक्रार फेटाळण्याच्या याचिकेवर विचार करण्यास कोर्टाने नकार दिला.
२०२०-२१ मध्ये केंद्राच्या आता रद्द केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध झालेल्या निदर्शनांशी संबंधित रिट्विटवरून तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली फौजदारी मानहानीची तक्रार रद्द करण्यासाठी राणौतने तिची याचिका मागे घेतली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर विचार करण्यास अनिच्छा व्यक्त केल्यानंतर रणौत यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.
वकिलांनी कोर्टाला हे सांगितलं की, कंगना यांनी एक ट्विट रिट्विट केले होते. परंतु कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, हे स्पष्टीकरण कनिष्ठ न्यायालयात दिले जाऊ शकते. जेव्हा कंगनाच्या वकिलाने सांगितले की, तिला पंजाबमध्ये सुरक्षित वाटत नाही आणि ती तिथे प्रवास करू शकत नाही. तेव्हा कोर्टाने तिला वैयक्तिक हजेरीपासून सूट मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना केली.
ही तक्रार २०२०-२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या ट्विटवरून आली आहे. तिच्या एका ट्विटमध्ये तिने एका महिला आंदोलनकर्तेबद्दल टिप्पणी केली होती आणि दावा केला होता की, ही तीच "आजी" (दादी) आहे, जी यापूर्वी शाहीन बाग निदर्शनांमध्ये सहभागी झाली होती.
हा संपूर्ण वाद २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहे, जेव्हा केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध देशभरात निदर्शने सुरू होती. कंगनाने एक ट्विट रिट्विट केले, ज्यामध्ये तिने पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी महिलेबद्दल टिप्पणी केली होती.
कंगनाने दावा केला होता की, ती तीच "दादी" आहे जी दिल्लीतील शाहीन बाग निषेधात सहभागी होती. त्या महिलेने ही टिप्पणी अपमानास्पद मानली आणि जानेवारी २०२१ मध्ये भटिंडा न्यायालयात कंगनाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.
त्या म्हणाल्या, कंगनाच्या टिप्पणीमुळे तिची प्रतिमा मलीन झाली आणि तिच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या.