

Fawad Khan-Vaani Kapoor starrer Aabeer Gulaal release worldwide
मुंबई - काश्मीरधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ल्यानंतर अबीर गुलाल या चित्रपटावर भारतात बंदीची मागणी होत होती. दरम्यान, अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान स्टारर चित्रपट 'अबीर गुलाल'च्या प्रदर्शनास भारतात बंदी घालण्यात आली. आता या चित्रपटाबद्दल नवी अपडेट समोर आलीय. हा चित्रपट वर्ल्डवाईड रिलीज होतोय.
फवाद खान-वाणी कपूर स्टारर अबीर गुलाल १२ सप्टेंबर रोजी वर्ल्डवाईड रिलीज होतोय. तर अशीही माहिती मिळतेय की, २६ सप्टेंबर रोजी भारतात रिलीज होईल. चित्रपट निर्माते आरती एस बागडी यांनी इन्स्टावर पोस्ट लिहून ही माहिती दिलीय.
दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात अंदाधुंद गोळीबार करून २८ जणांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर लोकांमध्ये रोष पसरला. चित्रपट इंडस्ट्रीत देखील त्याचे परिणाम झाले. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल चित्रपट रिलीज करण्यावर भारतात बंदी घालण्यात आली. इतकेच नाही तर अनेक पाकिस्तानी सेलेब्सचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बंद करण्यात आले होते.
इतकेच नाही तर वाढत्या दबावामुळे निर्मात्यांना अबीर गुलाल या चित्रपटाचा ट्रेलर YouTube इंडियावरून काढून टाकावा लागला होता. आता, दीर्घ प्रतीक्षेनंतर, फवाद खानचा हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी जगभरातील ७५ देशांमध्ये मोठ्या पडद्यावर येत आला. याआधी, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या दोन मोठ्या संघटनांनी भारतात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेतला होता.
'अबीर गुलाल'च्या माध्यमातून फवाद खानने ८-९ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये वापसी केलीय.