

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचा चर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट भूतबंगला थिएटर्समध्ये पडद्यावर येणार आहे, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हे चित्रपट मूळतः २ एप्रिल २०२६ ला रिलीज होण्याचे ठरले होते, पण बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा टाळण्यासाठी नवा दिवस निवडण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तापू, परेश रावल, जिशू सेनगुप्ता, असरानी, वामिका गब्बी असे लोकप्रिय कलाकार आहेत, आणि प्रेक्षकांना हसू आणि थरार यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
Bhooth Bangla release date announced
बॉलीवूडमध्ये इतर मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा होऊ नये म्हणून प्रियदर्शनने त्याचा चित्रपट भूतबंगलाची नवी रिलीज तारीख जाहीर केली. तब्बल १४ वर्षानंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी हॉरर-कॉमेडी भूतबंगला थिएटरमध्ये घेऊन येत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत रिलीज तारीख घोषित केली आहे.
याआधी भूतबंगला ला २ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होण्याचे सांगण्यात आले होते. पण मोठ्या फ्रँचायझी आणि बॉक्स ऑफिस हिट चित्रपट 'धुरंधर २' सारख्या चित्रपटांसोबत स्पर्धा असल्याने निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली होती. 'हेराफेरी', 'गरम मसाला', 'भूलभुलैया' आणि 'भागमभाग' नंतर भूतबंगला कोणकोणत्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडेल, याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसू आणि भीतीचा थरार अनुभवता येणार आहे.
‘भूत बंगला’ कधी रिलीज होणार?
प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूतबंगला' ची रिलीज तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा चित्रपट १५ मे, २०२६ रोजी चित्रपटगृहत रिलीज होईल. चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्टर शेअर करत भूतबंगलाची रिलीज तारीख घोषित केली आहे. पोस्टर सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'बंगल्यातून एक बातमी समोर आलीय! १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे भूतबंगला.'
‘भूत बंगला’ स्टार कास्ट
'भूत बंगला'ला आणखी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी शानदार कलाकारांची गर्दी पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार सोबत चित्रपटात तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिस्सू सेनगुप्ता, असरानी, वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, जयपूर, हैदराबाद येथे झाल्याची माहिती समोर आली आहे. कथा- आकाश ए कौशिक, स्क्रीनप्ले - रोहन शंकर, अभिलाष नायर, संवाद- रोहन शंकर यांचे आहेत.
'भूतबांगला'ची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमार यांनी केप ऑफ गुड फिल्म्स बॅनर अंतर्गत केली आहे. सह-निर्मिती फराह शेख आणि वेदांत बाली यांचे आहे.